लेनोवोचा फोर जी स्मार्टफोन जानेवारीत येणार

lenovo
लेनोवो ने त्यांचा स्वस्तातील फोरजी स्मार्टफोन एलटीई जानेवारीत लास वेगास येथे होत असलेल्या इलेक्ट्रोनिक शो मध्ये सादर केला जात असल्याची घोषणा केली असून हा शो ६ ते ९ जानेवारी दरम्यान होणार आहे. हा फोन भारतीय बाजारातही सादर केला जात असून त्याची किंमत आहे अवघी ६ हजार रूपये.

लेनोवोचा हा स्वस्त व मस्त स्मार्टफोन मायक्रोमॅक्सच्या युरेका यू व शिओमीच्या रिडमी नोट फोर जी शी स्पर्धा करेल. लेनोवोने या नवीन स्मार्टफोनसाठी स्नपड्रॅगन ४१०, अॅड्राईड किटकॅट ४.४ ऑपरेटिंग सिस्टीम, ५ इंची एचडी स्क्रीन, ८ एमपीचा रिअर कॅमेरा, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी २ एमपीचा फ्रंट कॅमेरा अशी फिचर्स दिली आहेत.

Leave a Comment