मोदी सरकारने केल्या देशभरातील ३२ वेबसाईट्स बंद !

modi
नवी दिल्ली – देशभरातील ३२ वेबसाईटस् मोदी सरकारने बंद केल्या असून ज्या नेटिझन्सनी Pastebin, Github आणि DailyMotion सारख्या वेबसाईटस् अॅक्सेस करण्याचा प्रयत्न केला, त्यांना एरर येत आहे. त्याबाबत युझर्सनी तक्रार केली आहे. त्यांच्या कॉम्प्युटर आणि मोबाईलवर या वेबसाईट्स ओपन होत नाहीत. बीएसएनएल आणि वोडाफोन यासारख्या इंटरनेट सर्व्हिस प्रोवाईडर्सचे युझर्स यासारख्या वेबसाईट्स अॅक्सेस करू शकत नाहीत.

वेबसाईट ब्लॉकबाबतची सर्वप्रथम माहिती Pastebin ने दिली. Pastebin ही अशी वेबसाईट आहे, ज्यावर तुम्ही ठराविक काळासाठी आपला डेटा स्टोअर करू शकता. १९ डिसेंबरला ट्विटरवरून या वेबसाईटने वेबसाईट ब्लॉक बाबत माहिती दिली. Pastebin ने ट्वीट केले आहे की, “Pastebin.com ला भारतात ब्लॉक केले आहे. जर तुम्ही भारतात असाल, आणि वेबसाईट अॅक्सेस करू शकत नसाल, तर आम्हाला मेल करा”. अनेक युझर्सनी Reddit साईट अॅक्सेस करता येत नसल्याचे मेल केले आहेत. यूझर्सच्या म्हणण्यानुसार, वोडाफोन, बीएसएनएल आणि हॅथवेकडून Reddit ला ब्लॉक केले आहे. कदाचित या सगळ्या साइट्स टेलिकॉम विभागाच्या (DoT) आदेशनुसार ब्लॉक करण्यात आल्या आहेत. कारण यापूर्वीच टेलिकॉमने १७ डिसेंबरला याबाबतची नोटीस जारी केली होती. या नोटीसमध्ये 32 साईट्स ज्यामध्ये Pastebin, Github आणि DailyMotion या साईट्स ब्लॉक करण्यात आल्याचे सांगितले होते

Leave a Comment