तहानलेल्या बिजिंगसाठी १२०० किमीवरून येतेय पाणी

beijing
बिजिंग – चीनची राजधानी बिजिंगची तहान भागविण्यासाठी १२०० किमीवरून पाणी आणण्याचा पराक्रम चीन सरकारने करून दाखविला आहे. चीनची मुख्य नदी यांगत्सेची उपनदी हाजियांग नदीतून कालव्याद्वारे आणले जात असलेले हे पाणी बिजिंगला पोहोचण्यास १५ दिवस लागतात. या योजनेसाठी ८० अब्ज डॉलर्स खर्च आला आहे.

बिजिंगला सातत्याने पाणी संकटाचा सामना करावा लागत होता.या समस्येवर उपाययोजनाही १२ वर्षांपूर्वीच केली गेली होती आणि या कालव्याच्या कामास आरंभ करण्यात आला होता. मात्र चीनमधील पीत नदी या दोन नंबरच्या मोठ्या नदीखालून ४००० मीटरवरून दोन बोगदे या योजनेसाठी खणावे लागणार होते आणि हे काम आव्हानात्मक होते. त्यामुळे या कामासाठीच नियोजित वेळेपेक्षा अधिक वेळ लागला. परिणामी योजनेचा खर्चही ५९ अब्ज डॉलर्सवरून ८० अब्ज डॉलर्सवर गेला असे समजते.

Leave a Comment