सात जानेवारीला आयएनजी वैश्य बँकेचे कर्मचारी संपावर

ing
मुंबई – सात जानेवारीला एक दिवसाच्या संपावर जाण्याचा इशारा आयएनजी वैश्य बँकेच्या कर्मचारी संघटनेने दिला आहे. आयएनजी वैश्य बँकेचे कोटक महिंद्रा बँकेत विलिनीकरण होणार आहे. बँकेच्या बंगळुरु येथील मुख्यालयात १५ हजार कोटींच्या विलिनीकरणाच्या प्रस्तावाला समभागधारकांची मंजुरी सात जानेवारीला घेण्यात येणार असल्याने त्याच दिवशी संपावर जाण्याचा इशारा युनियनने दिला आहे.

दोन्ही बँकांच्या विलिनीकरणानंतर आयएनजी वैश्य बँकेतील कर्मचा-यांना नोकरीची हमी देण्यात यावी या मागणीसाठी हा संप पुकारण्यात येणार आहे, असे आयएनजी वैश्य बँक ऑफिसर्स असोसिएशनचे एस. ए. श्रीधर यांनी सांगितले. दरम्यान, कोटक महिंद्रा बँकेचे प्रवक्ते रोहित राव यांनी सांगितले की, बँकिंग रेग्युलेशन कायद्यानुसार विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. त्यासाठी समभागधारकांची मंजुरी आणि त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेची मंजुरी घेण्यात येणार आहे. त्याशिवाय `सीसीआय’चीही मंजुरी घेतली जाणार आहे.

Leave a Comment