२४ कोळसा खाणींच्या लिलावासाठी केंद्र सरकारने मागविल्या निविदा

coalgate
नवी दिल्ली – केंद्र सरकारने २४ कोळसा खाणींच्या लिलावाच्या पहिल्या टप्प्यात निविदा मागविल्या आहेत. या २४ खाणींपैकी सात खाणी छत्तीसगडमधील आहेत. याशिवाय पहिल्या टप्प्यात वाटप करण्यात येणा-या २४ खाणींपैकी मध्यप्रदेशमधील सहा, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि झारखंड मधील प्रत्येकी तीन आणि आंध्रप्रदेश व ओडिशा मधील प्रत्येकी एका खाणींचा समावेश आहे.

२४ डिसेंबर रोजी कोळसा अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाने पुन्हा जारी करण्यासाठी तसेच खाण वाटपासाठी आवश्यक असलेल्या सूचनांना मंजूरी दिली होती. पहिल्या टप्प्यातील २४ कोळसा खाणींच्या ई-लिलावाची प्रक्रिया सुरु करताना केंद्रीय कोळसा व ऊर्जा मंत्री पियूष गोएल यांनी सदर लिलाव प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असल्याचे सांगितले आहे.

Leave a Comment