बारमालकाने`होम डिलिव्हरी’ न केल्यास पोलिस घेणार ताब्यात!

drunkers
मुंबई – वाहतूक पोलिसांनी बार आणि पब मालकांना नववर्षाचे स्वागत करणा-या `तळीरामां’ची होम डिलिव्हरी करण्याचे आदेश दिले असून संबंधित तळीरामांना हॉटेल मालकांनी घरपोच न केल्यास अशा मालकांविरोधात आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली जाणार असल्याचे वाहतूक पोलिस उपायुक्त बी. के. उपाध्याय यांनी सांगितले.

गेट वे ऑफ इंडियासह शहरातील चौपाटय़ा, समुद्र किना-यावर मुंबईकरांची दरवर्षी नववर्षाच्या स्वागताला गर्दी वाढते. तसेच बार, पब, नाईट क्लबमध्ये किंवा खासगी ठिकाणांवर पाटर्य़ांची मैफेल रंगते. यावेळी महिलांच्या सुरक्षेची योग्य ती खबरदारी संबंधित मालकांनी किंवा आयोजकांनी घ्यावी, अशा सूचना मुंबई पोलिसांनी दिल्या आहेत. नववर्षाच्या स्वागताला अनुचित घटनेचे गालबोट लागू नये यासाठी पोलिसांनी व्यूहरचना आखली आहे.

Leave a Comment