एसीबीकडून दररोज चार भ्रष्ट अधिकारी अटकेत

corrup
महाराष्ट्रातील भ्रष्टाचार प्रतिबंधक दलाने म्हणजे एसीबीने या वर्षात दररोज सरासरी चारपेक्षा अधिक भ्रष्टाचारी अधिकारी आणि दलालांना अटक करण्याची कामगिरी बजावली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. एसीबीच्या या कारवाईमुळे सरकारी नोकरशाही चांगलीच धास्तावली असल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे भ्रष्ट अधिकारी आणि दलालांसोबतच माजी मंत्री, आमदार, खासदार, विधानपरिषद सदस्य यांच्याविरोधातही तपास सुरू झाला असून त्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ आणि त्यांचे कुटुंबिय, काँग्रेसचे कृपाशंकर सिग, सुनील तटकरे या मंत्र्यांचा समावेश आहे. एसीबीचे संचालक प्रवीण दीक्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या विभागाने या वर्षात १६६१ भ्रष्ट अधिकारी आणि दलालांना बेड्या घातल्या असून गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ११७ टक्के अधिक आहे.

Leave a Comment