धोनीच्या निवृत्तीनंतर ट्विटरवर संदेशांचा पूर

dhoni
नवी दिल्ली – सोशल मीडियावर महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेवर मॅसेजेसचा पूर आला आहे. निवृत्तीच्या घोषणेनंतर काही वेळातच धोनी ट्विटरच्या टड्ढेंडिग लिस्टमध्ये टॉपवर आला आहे. धोनीच्या निवृत्तीने अनेकजण भाऊक झाले आहेत. धोनीच्या या निर्णयानंतर धोनीने गेल्या दहा वर्षांच्या काळात भारतीय कसोटी क्रिकेटला गाठून दिलेली उंची, कसोटीतील त्याच्या अविस्मरणीय खेळी, त्याच्यासोबतच्या आठवणी, यशस्वी नेतृत्त्व याबद्दल ट्विटरकर धोनीचे आभार व्यक्त करत आहेत. तर काहीजण आगामी विश्वचषकासाठी धोनीला शुभेच्छा देत आहेत.

Leave a Comment