रेडमी नोट ४ जी ६ सेकंदात सोल्ड आऊट

redmi
चिनी स्मार्टफोन कंपनी शिओमीने भारतातील त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीत मिळविलेल्या यशाची पुनरावृत्ती केली आहे. ३० डिसेबरला दुपारी २ वाजता फ्लिपकार्टवर रेडमी नोट फोर जीचा झालेला फ्लॅशसेल त्यासाठी पुरेसा बोलका ठरला आहे. या फ्लॅशसेलमध्ये रेडमी नोट ४ जी ची ४० हजार युनिट अवघ्या सहा सेकंदात विकली गेली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. रेडमी नोटची भारतातील ही पहिलीच विक्री होती.

रेडमी नोट फोर जी साठी तब्बल २ लाख लोकांनी नोंदणी केली होती. रेडमी नोट फोर जी आता ६ जानेवारीला पुन्हा विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाणार असून त्यासोबत रेडमी वन एस ही विक्रीसाठी येणार आहे. यासाठीही पूर्वनोंदणी आवश्यक असून ती ३० डिसेंबरपासून सुरू झाली असल्याचे कंपनीने कळविले आहे. रेडमी नोट फोर जी भारतातील सहा शहरांत एअरसेल स्टोअर्समध्येही मिळणार आहे मात्र अद्यापी या शहरांची नांवे जाहीर केली गेलेली नाहीत. ९९९९ रूपयांत हा स्मार्टफोन ग्राहकांना उपलब्ध आहे. एअरसेलच्या स्टोअर्समधून हा फोन खरेदी करायचा असेल तर त्यासाठी वेगळी नोंदणी करावी लागणार असल्याचेही समजते.

Leave a Comment