१ जानेवारीपासून ‘ओप्पो’च्या फोर-जीची प्री-बुकिंग

oppo
नवी दिल्ली – ‘ओप्पो आर ५’ नावाच्या फोर-जी फोनची घोषणा चिनी स्मार्टफोन उत्पादक ओप्पोने केली असून या फोनची किंमत २९,९९० रुपये एवढी आहे आणि यांची प्री-बुकिंग १ जानेवारीपासून सुरू होणार आहे.

ऑक्टा-कोअर क्वालकॉम एमएसएम८९३९ प्रोसेसर, ५.२ इंचाचा एएमओएलईडी स्क्रीन या फोनमध्ये असल्याचे कंपनीने म्हटले असून यामध्ये १३ मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा असून पीआय २.० प्लस फ्लॅश शॉट टेक्नॉलॉजीने युक्त हा कॅमेरा आहे. ओप्पो इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम लू यांनी हा फोन ग्राहकांचा विचार करून तयार करण्यात आला असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment