दुसऱ्यांदा होणार फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार

chandrakant-patil
मुंबई – लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा दुसऱ्यांदा विस्तार होणार या मंत्रिमंडळात १२ मंत्र्याचा समावेश होणार आहे.

या मंत्रिमंडळात भाजपचे सहा, शिवसेनेचे दोन आणि इतर मित्रपक्षातील चार जणांचा समावेश होणार असून हा विस्तार कधी होणार याबाबत माहिती सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली नाही.

विधानसभा निवडणुकीत १२२ जागा जिंकत भाजने महाराष्ट्रातील सत्ता काबीज केली होती. त्यानंतर भाजपाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह दहा मंत्र्यांचा शपथविधी ३१ ऑक्टोबरला थाटात पूर्ण केला. त्यानंतर पाच डिसेंबरला शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिवसेनेच्या दहा आणि भाजपाच्या १० मंत्र्यांचा शपथविधी पार पडला.

Leave a Comment