विश्वचषक स्पर्धेतून अजमल सईदची माघार

saeed-ajmal
इस्लामाबाद : गोलंदाजीच्या अवैध शैलीमुळे निलंबनाची कारवाई करण्यात आल्यामुळे पाकिस्तानच्या सईद अजमलने विश्वचषक स्पर्धेतून माघार घेतली आहे. मात्र त्याने चाचणी न देण्याचे ठरविल्याने त्याने हा माघारीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकला एकप्रकारे हा मोठा धक्का बसला आहे.

अजमलने अधिकृत चाचणीतूनच माघार घेतली आहे. याचाच अर्थ असा की त्याने विश्वचषक स्पर्धेतूनही माघार घेतली आहे.’ आपल्या शैलीची चाचणी करून घेण्यासाठी अजमल व मोहम्मद हाफीझ भारतात जाणार होते. पण अजमलने माघार घेतल्याने फक्त हाफीझ भारतात चाचणीसाठी जाईल, असे पाक क्रिकेट मंडळाचे प्रवक्ते आगा अकबर यांनी सांगितले. आपली शैली सुधारण्यासाठी अजमल माजी स्पिनर्स सकलेन मुश्ताक व मुश्ताक अहमद यांच्यासमवेत काम करणार आहे, असेही सांगण्यात आले. गेल्या सप्टेंबरमध्ये आयसीसीने अजमलवर तर हाफीझवर अवैध शैलीमुळे याच महिन्यात बंदी घातली होती.

Leave a Comment