स्पर्धात्मक सामन्यांमधून प्रज्ञान ओझा आऊट

pragyan-ojha
मुंबई : आता एका भारतीय गोलंदाजाची शैलीही पाकिस्तानी गोलंदाजांपाठोपाठ सदोष असल्याचे समोर आले असून बीसीसीआयने सदोष गोलंदाजी शैलीमुळे भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझावर बंदी घातली आहे. ओझाला आता स्पर्धात्मक सामन्यामध्ये खेळता येणार नाही.

आपल्या गोलंदाजीच्या शैलीत सुधारणा करण्यासाठी ओझाला आता चेन्नईला पाठवण्यात येणार आहे. प्रज्ञान ओझा हा हैदराबादकडून स्पर्धात्मक क्रिकेट खेळतो आणि बीसीसीआयने ओझाच्या गोलंदाजी शैलीबाबतची माहिती हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला दिली आहे.
त्यामुळे ओझाला रणजी सामन्यापासून दूर ठेवण्यात आले आहे. प्रज्ञान ओझाची गोलंदाजी शैली ही गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोव-यात सापडली होती. ओझाने भारताकडून केवळ २४ कसोटी सामन्यांमध्ये ११३ विकेट्स घेण्याचा पराक्रम गाजवला आहे. तर १८ वन डेत ओझाच्या नावावर २१ विकेट्स जमा आहेत.

Leave a Comment