ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात यावे : मिल्खा

dhaynchand
चंदीगड : मिल्खा सिंग यांनी भारतीय हॉकीला सुवर्णमय दिशा दाखविणा-या मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात यावे, अशी मागणी केली आहे. स्वातंत्र्यसैनिक मदन मोहन मालवीय व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांनी आनंदही व्यक्त केला आहे.

भारताकडून १९५६ व १९६० च्या ऑलिम्पिक गेम्समध्ये सहभागी झालेले मिल्खा सिंग म्हणाले की, ‘ध्यानचंद यांच्या कारकिर्दीत भारताने १९२८, १९३२, १९३६ च्या ऑलिम्पिकमध्ये हॉकीचे सुवर्णपदक मिळविले होते. त्यांनी भारतीय हॉकीला नवी दिशा दाखवली.’ याला अनुसरून मिल्खा सिंग यांनी ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. भारतरत्न हा पुरस्कार जिवंत व्यक्तींनाच देण्यात यावा, असेही त्यांनी सुचविले आहे. सचिन तेंडुलकरला या पुरस्काराने सन्मानित केल्याचा निर्णय योग्य होता, असेही ते म्हणाले.