महसुल विभाग राबवणार अभिनव प्रणाली

sand-mafia
मुंबई – राज्याच्या महसूल विभागाने राज्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले असून, मोबाईलच्या माध्यमातील अभिनव स्मॅट्‌स प्रणाली वाळूमाफियांच्या कारनाम्यांवर अंकुश ठेवण्यासाठी राबवण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे राज्याच्या तिजोरीत भर पडेल आणि वाळूमाफियांनाही चाप बसेल, असा सरकारला विश्‍वास वाटत आहे. स्मॅट्‌स पद्धतीमुळे कोठे वैध वा अवैध वाळू उत्खनन सुरू आहे, त्याची वाहतूक होत आहे, किती खोल उत्खनन झाले आहे, वाळू किती ब्रास काढण्यात आली, तिची ने-आण करण्यासाठी कोणत्या क्रमांकाचा ट्रक वापरला, उपसा केंद्र आणि पुरवठादार यांच्यात नेमके किती अंतर आहे आणि ते किती तासांत कापले जाईल, वाहनचालक कोण आहे ही सारी माहिती मोबाईलवरून आवश्यक त्या नमुन्यात उपलब्ध होईल. तहसीलदार, जिल्हाधिकारी त्याची खातरजमाही करू शकतील. त्यामुळे बेकायदा वाळू उत्खनन बंद होईल, अशी खात्री अधिकार्‍यांनी व्यक्त केली.

Leave a Comment