मायक्रोसॉफ्टची ‘डिजिटल इंडिया’ला साथ

satya
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ सत्या नडेला यांनी दिल्लीत भेट असून भारतामध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात या भेटीदरम्यान नडेला उत्सुक दिसले. नडेला आणि मोदींमध्ये अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांवर या बैठकीत चर्चा झाली.

नडेला यांनी नरेंद्र मोदींना शिवाय डिजिटल इंडिया या उपक्रमाला सहाय्य करण्याचा विश्वास दिला. मूळच्या हैदराबादच्या नडेला यांनी मोदींशी भेट घेतल्यानंतर टेलिकॉममंत्री रविशंकर प्रसाद आणि केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांचीही भेट घेतली. सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांवर या भेटीत चर्चा झाली.

Leave a Comment