
इस्लामाबाद – पाकिस्तान सरकारने पेशावर येथील लष्कर शाळेवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर देशातील दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी कडक पावले उचलली असून दहशतवाद्यांविरुद्ध सुरू असलेले खटले जलदगतीने चालवण्यासाठी लष्करी न्यायालये स्थापन करण्याची घोषणा पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केली आहे.
अतिरेक्यांच्या सुनावणीसाठी पाकमध्ये लष्करी न्यायालये
पाकिस्तानमधील सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांची शरीफ यांनी बैठक घेतली. तब्बल ११ तास चाललेल्या या बैठकीत दहशतवाद्यांविरुद्ध करण्यात येणाऱ्या कठोर उपाययोजनांबद्दल चर्चा झाली. त्यानंतर मध्यरात्री शरीफ यांनी देशाला उद्देशून भाषण करताना दहशतवाद्यांविरुद्धचे खटले चालवण्यासाठी विशेष लष्करी न्यायालये स्थापन करण्याची घोषणा केली.
