जॅकी चॅनच्या मुलाला तुरुंगवास

jackie
चीन सरकारने अंमली पदार्थांच्या सेवनासाठी दुसऱ्यांना घरात आश्रय देण्याचा ठपका अॅक्शन फिल्म स्टार जॅकी चॅनचा मुलगा जेसी चॅनवर ठेवला आहे.

तैवानचा सिनेस्टार को काई याच्या सोबत चार महिन्यांपूर्वी जेसी चॅनला बिजिंगमधील अपार्टमेंटमधून बिजिंग पोलिसांनी अटक केली होती. चॅनच्या घरातून १०० ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. चॅन आणि को यांनी मारिजूआनाचे सेवन केल्याचे तपासणी अंती निष्पन्न झाले होते. तैवानचा सिनेस्टार को काई याला अंमली पदार्थाच्या सेवनाच्या आरोपाखाली १४ दिवस कोठडीत ठेवण्यात आले होते. आता त्याच्यावर आरोपही निश्चित करण्यात आले आहेत. जेसी चॅन दोषी आढळल्यास त्याला तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.

Leave a Comment