इस्त्रोचे अध्यक्ष ‘नेचर जर्नल’च्या यादीत!

isro
मुंबई – ‘नेचर’ या प्रतिष्ठित जर्नलने २०१४ सालातील टॉप टेन शास्त्रज्ञांमध्ये इस्त्रो अर्थात इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष डॉ. राधाकृष्णन यांची निवड केली असून भारतात राहून काम करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञाची निवड होण्याची ही गेल्या काही वर्षांमधली ही पहिलीच वेळ आहे.

या टॉप टेन शास्त्रज्ञांमध्ये युरोपिअन स्पेस एजन्सीच्या रोझेटाचे फ्लाईट ऑपरेशन डायरेक्टर अँड्रिया अकोमाझो यांचाही समावेश करण्यात आला आहे. पहिल्याच प्रयत्नात भारताच्या मंगळ मोहिमेने अभूतपूर्व यश संपादन करण्याची ऐतिहासिक कामगिरी बजावल्यामुळे डॉ. राधाकृष्णन यांची निवड झालेली आहे.

भारताच्या मंगळयानाने पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत प्रवेश करण्याचा विक्रम नोंदवला. आशियाई देशांमध्येही मंगळावर यशस्वी स्वारी करणारा भारत पहिला देशा ठरला आहे. या व्यतिरिक्त इस्त्रोने आणखी दोन महत्वाचे मैलाचे टप्पे यंदाच्या वर्षात पार केले आहेत.
‘नेचर’ने केलेला गौरव हा माझा एकट्याचा नसून एका महत्वपूर्ण तंत्रज्ञानाची मोहिम यशस्वीपणे पार पाडणाऱ्या पूर्ण टीमचा असल्याची भावना डॉ. राधाकृष्णन यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment