सिरीयात शाळेवरील हवाई हल्ल्यात १० ठार

dashmik
सिरीयाची राजधानी दमिश्क जवळ दोन शाळांवर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात किमान १० विद्यार्थी ठार तर अनेक जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे हे हल्ले दहशतवादी संघटनांनी केलेले नसून सिरीयाई हवाई दलानेच केले आहेत. या भागातील दहशतवाद्यांच्या तळावर लष्कराकडून लढावू विमानांतून हल्ले केले जात आहेत त्यात या शाळांवरही बॉम्ब पडले असल्याचे समजते.

दमिश्कजवळच्या इदलिब प्रांतातील सफोहान येथील शाळेवर या विमानांनी केलेल्या हल्ल्यात ७ मुले ठार झाली आहेत तर दुमा क्षेत्रातील शाळेवर केलेल्या हल्ल्यात ३ मुले ठार झाली आहेत. असंख्य विद्यार्थी जखमी झाले आहेत. सोमवारी शाळेच्या बसवरही हवाई हल्ला करण्यात आला होता त्यातही ३ मुले ठार झाली होती असेही समजते.

Leave a Comment