भाजपच्या वाटेवर मनसेचे माजी आमदार !

mns
नाशिक – राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चार माजी आमदार भाजपाच्या वाटेवर निघाले असून, नववर्षाच्या सुरुवातीलाच ते भाजपात प्रवेश करण्याची शक्यता असून असे झाल्यास पराभवाच्या धक्क्यातून अद्याप न सावरलेल्या मनसेला हा फार मोठा धक्काच राहणार आहे.

स्थानिक भाजपा पदाधिकार्‍यांनी मनसेच्या या नेत्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध दर्शविला असून प्रदेश भाजपाने या सर्वांना स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेचे माजी आमदार व पदाधिकारी भाजपमध्ये जानेवारीत राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

काही पराभूत उमेदवारांनी राज ठाकरे यांच्या अतिशय जवळचे असलेले अविनाश अभ्यंकर व बाळा नांदगावकर यांच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या. त्याकडे राज ठाकरे यांनी दुर्लक्ष केल्याने प्रवीण दरेकर, वसंत गीते आणि अनेक पदाधिकार्‍यांनी राजीनामास्त्र उपसले होते. राज ठाकरे यांनीही आपल्याच भोवतातील लोकांना प्राधान्य देत पक्ष स्थापनेत मोलाचा वाटा उचलणार्‍या या पदाधिकार्‍यांकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे काही माजी आमदार व पदाधिकारी पक्षापासून दूर गेले. त्यात प्रामुख्याने नाशिक आणि मुंबईतील पदाधिकार्‍यांचा समावेश आहे.

Leave a Comment