कोल्हापूरवासीयांची टोलमधून मुक्ती!

toll-plaza
कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांनी आज कोल्हापूरातील टोल संदर्भात बैठक बोलावली असून या बैठकीसाठी कोल्हापुरातील सर्वपक्षीय आमदार, मंत्र्यांना बोलावण्यात आले आहे. यात कोल्हापुरातील टोल रद्द करण्याबाबत चर्चा केली जाणार आहे.

ही बैठक दुपारी २.३० वाजता आयोजित करण्यात आल्यामुळे कोल्हापुरातील टोल रद्द करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. कोल्हापुरातील टोलला स्थानिकांचा जोरदार विरोध आहे. गेल्या काही दिवसांपासून हा विरोध अधिक तीव्र झाला आहे. आघाडी सरकार असताना झालेल्या आंदोलनांमध्ये सध्याच्या सत्ताधाराऱ्यांनी देखील अनेकदा सहभाग घेतला.

Leave a Comment