जुन्या नोटा बदलण्यास मुदतवाढ

rbi
मुंबई : २००५ पूर्वीच्या नोटा चलनातून वगळण्याची मुदत भारतीय रिझर्व्ह बँकेने वाढली असून त्यामुळे आता जुन्या नोटा म्हणजेच २००५ पूर्वीच्या चलनी नोटा बदलण्यासाठी सहा महिन्यांची वाढीव मुदत मिळाली आहे. काही दिवसांपूर्वीच ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत नोटा बदलण्यासाठी देण्यात आली होती. आता यात सहा महिन्यांची मुदतवाढ झाली असून तुम्हाला ३० जूनपर्यंत तुम्हाला नोटा बदलता येणार आहेत.

२००५पूर्वीच्या ५ लाख २ हजार ८५५ कोटी किमतीच्या १४४ कोटी ६६ लाख नोटा चलनातून वगळण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतल्यामुळे या जुन्या नोटा आता १ जुलैपर्यंत बदलणे आवश्यक आहे. याबाबत बँकेने एक प्रसिद्धी काढले असून या पत्रकाद्वारे मुदत वाढवत असल्याचे स्पष्ट केले आहे.

Leave a Comment