राज ठाकरे नवीन वर्षाची सुरवात नाशिकमधून करणार

raj
नाशिक- नाशकात पक्षातील जुन्या जाणत्या नेत्यांनी राजीनामे दिल्यानंतर नाशिकची धुरा नव्या नेत्यांच्या हाती सोपविण्याचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मानस असून ते नवीन वर्षाची सुरवात नाशिकचा तीन दिवसांचा दौरा करून करणार असल्याचे समजते.

राज या दौर्‍यात नाशिकमधील रेंगाळलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतील तसेच संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकर आणि प्रदेश पदाधिकारी नितीन सरदेसाई यांच्या पैकी एकाच्या हाती नाशिकची धुरा सोपवितील असेही सांगितले जात आहे. या अगोदर राज यांचा हा दौरा २६ डिसेंबरपासून सुरू होणार होता मात्र तो पुढे ढकलण्यात आला. नवीन वर्षाची सुरवात राज नाशिकातून करणार आहेत.

नाशिक येथील महत्वाकांक्षी गोदा पार्क, शिवाजी उद्यान, बोटॅनिकल गार्डन यासारख्या प्रकल्पांबरोबरच यावेळी राज शहरातील अन्य उद्यानांच्या सौंदर्यीकरणाकडेही लक्ष देणार आहेत. त्याचबरोबर फाळके स्मारक आणि सायकल अॅडव्हेंचर सेंटरसंदर्भातील कामाच्या प्रगतीचाही आढावा घेणार आहेत असे समजते. संघटना मजबुतीसाठी राज विविध नेत्यांशी चर्चा आणि बैठकाही करणार आहेत.

Leave a Comment