गुगलचा हैद्राबादेत स्वतःचा कँपस?

goog
इंटरनेट जायंट गुगलने हैद्राबादेत त्यांचा कायमस्वरूपी मोठा कँपस उभारणीची तयारी सुरू केली असून या संदर्भातील सहमती करारावर तेलंगाणा सरकार लवकरच स्वाक्षर्‍या करेल असे तेलंगणाचे आयटी व इलेक्ट्रोनिक मंत्रालयाचे सचिव हरप्रीतसिंग यांनी सांगितले. गुगलने असा कँपस उभारण्यासाठी यापूर्वीच सहमती दर्शविली आहे. हे प्रत्यक्षात घडले तर अमेरिका आणि ब्रिटननंतर गुगलचा हा तिसरा मोठा कँपस ठरेल.

सध्याही गुगलचे काम हैद्राबादेत सुरू आहे मात्र त्यासाठी भाडेकरारावर जागा घेण्यात आल्या आहेत. आपल्या मालकीचा व कायमस्वरूपी कँपस येथे असावा अशी गुगलची मनीषा आहे व त्यासाठी सरकार आणि गुगल प्रयत्नशील असल्याचेही हरप्रितसिंग यांनी सांगितले. हैद्राबादला वायफाय सिटी बनविण्याच्या प्रस्तावित योजनेत सिस्को, एअरटेल, व्होडाफोन आणि एका तैवानी कंपनीने रस दाखविला असल्याची माहितीही या वेळी हरप्रितसिंग यांनी दिली.

Leave a Comment