पळून जाणाऱ्या १०० दहशतवाद्यांची इसिसने केली हत्या

isis
बगदाद – इसिस या जहाल दहशतवादी संघटनेचा आणखी एक क्रूर चेहरा पुन्हा एकदा समोर आला असून इराक व सीरियातील लढ्यात सहभागी होण्यासाठी विदेशातून आलेल्या सुमारे १०० अतिरेक्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला असता, इसिसने त्यांना गोळ्या घालून ठार केले.

याबाबतचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने प्रकाशित केले असून गेल्या आठवड्यात हे हत्याकांड सीरियातील रक्का शहरात झाले. इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी आपले घरदार आणि देश सोडून आलेल्या अनेक विदेशी नागरिकांच्या हाती निराशा आल्याने त्यांना मायदेशी परतण्याची इच्छा आहे. पण, इसिसकडून त्यांना तशी परवानगी नाकारली दिली जात नाही. या संघटनेत बोलण्याचेही स्वातंत्र्य नसल्याचे वृत्तात म्हटले आहे.

दोन महिन्यांपूर्वीही युरोपीय देशांमधून आलेल्या १२ जणांनी मायदेशी परत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या सर्वांना इसिसने बंदी बनविले. सीरियामध्ये अध्यक्ष बशर अल असद यांच्याविरुद्ध लढण्याऐवजी या विदेशी नागरिकांना स्थानिक कट्टरतावादी गटांशी लढावे लागत आहे. इसिसमध्ये सहभागी झालेल्या एका ब्रिटीश दहशतवाद्याने सांगितले की, ब्रिटनच्या आणखी अशाच ३० ते ५० जिहादींनाही परत जाण्याची इच्छा होती. पण, त्यांनाही ठार मारण्यात आले.

Leave a Comment