इमारतीला लागलेल्या भीषण आगीत वृध्देचा मृत्यू

fire
पुणे – कोथरुड परिसरातील महात्मा सोसायटीतील एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर सोमवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. तर, एका तरुणीला वाचविण्यात यश आले आहे.

सकाळी सातच्या सुमारास महात्मा सोसायटीतील एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशामन दलाचे जवान तेथे दाखल झाले. त्यांनी बचावकार्य करत त्यांनी एका तरुणीला वाचविले. पण, आगीत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.

जवानांनी आता आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवल असून पुढील तपास सुरु आहे. आग लागण्याच नेमक कारण अजून स्पष्ट झाल नसल तरी, शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागल्याची शक्यता आहे.

Leave a Comment