जीएसटी विधेयकामुळे सावरतो आहे शेअर बाजार

share-market
मुंबई – गुंतवणूकदारांनी पुन्हा जागतिक आर्थिक स्थितीमध्ये सुधारणेचा विश्वास आणि लोकसभेमध्ये सादर झालेल्या महत्वपूर्ण जीएसटी विधेयकामुळे शेअर्सच्या खरेदीवर भर दिला आहे.

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात सोमवारी सकाळी ८७ अंकांची वधारणा दिसून आली. सलग तिस-या दिवशी बीएसई सेन्सेक्समध्ये वाढ झाली आहे. मागच्या दोन सत्रात बीएसई सेन्सेक्समध्ये ६६१ अंकांची वाढ झाली. सध्या बीएसई सेन्सेक्स २७,४५९ अंकांवर आहे. धातू, एफएमसीजी, भांडवली वस्तू आणि बांधकाम क्षेत्राच्या शेअर्समध्ये तेजी आहे.

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही १८.१० अंकांची वाढ झाली आहे. निफ्टी सध्या ८२४३ वर आहे. बहुप्रतिक्षित जीएसटी विधेयक मंजूर झाल्यानंतर आर्थिक सुधारणा कार्यक्रमाला अधिक गती येईल अशी गुंतवणूकदारांना अपेक्षा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेअर बाजारात तेजी दिसत आहे.

Leave a Comment