
इस्लामाबाद – शुक्रवारी रात्री नऊ च्या सुमारास मुशर्रफ हल्ला प्रकरणातील दोन दहशतवाद्यांना फाशीवर चढविण्यात आल्याचे वृत्त आहे. आणखी चार जणांना शनिवारी म्हणजे आज फाशी दिली जाणार असल्याचेही पाकिस्तानी मिडीयाने प्रसिद्ध केले आहे.
पाकिस्तानात दोन दहशतवाद्यांना फाशी
मंगळवारी पेशावर शाळेवरील हल्यात शाळकरी मुलांना ठार करण्यात आल्यानंतर लगोलग शरीफ यांनी फाशी शिक्षेवरील बंदी उठविण्याची घोषणा केली होती. पाकच्या सेना प्रमुखांनी सहा जणांच्या फाशी शिक्षेवर शिक्कामोर्तब करून सही केली होती. फाशी देण्यात आलेले दोघे या सहांपैकीच असल्याचे समजते. ज्या १७ दहशतवाद्यांच्या फाशीला स्थगिती देण्यात आली होती त्यात हे दोघेही होते. रावळपिडी आर्मी जनरल मुख्यालयावर २००९ साली त्यांनी हल्ला केला होता मात्र जखमी अवस्थेत त्यांना जिवंत पकडले गेले होते.
अकील उर्फ डॉ.उस्मान व अशरद महमूद अशी या दोघांची नांवे असून त्यांनी तत्कालीन सेनाप्रमुख व पाकचे माजी राष्ट्रपती जनरल परवेझ मुशर्रफ यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात मुशर्रफ बचावले होते पण अन्य १५ जण ठार झाले होते. त्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरविले होते.
