स्वदेशी ग्लाईड बॉम्बची चाचणी यशस्वी

bomb
स्वदेशी बनावटीच्या १००० किलो वजनाच्या ग्लाईड बॉम्बची बंगालच्या उपसागरात ओडिशा जवळ घेतलेली चाचणी यशस्वी ठरली असून या बॉम्बने १०० किमी अंतरावर अचूक निशाणा साधला असल्याचे डीआरडीओकडून घोषित करण्यात आले आहे. या यशस्वी चाचणीमुळे भारत गायडेड प्रिसिजन बॉम्ब क्षेत्रात स्वयंपूर्ण झाला असल्याचे डीआरडीओचे महासंचालक अविनाश चंदर यांनी सांगितले.

चंदर म्हणाले की भारतीय वायूदलाच्या विमानातून हा बॉम्ब टाकला गेला तेव्हा त्याने १०० किमी अंतर पार करून निशाणा अचूक भेदला. यामुळे देशाने असे बॉम्ब डिझाईन करणे, विकसित करणे व लाँच करण्यातील आपली क्षमता सिद्ध केली आहे. या बॉम्बला ऑन बोर्ड नेव्हीगेशन सिस्टीमच्या सहाय्याने दिशा दिली गेली होती. रडार व इलेक्ट्रो अॅप्टिक फायबरच्या मदतीने या बॉम्बच्या प्रवासावर लक्ष ठेवण्यात आले होते.

Leave a Comment