राज्यात थंडीची लाट

winter
मुंबई – देशभरात थंडीची लाट पसरल्याने राज्यातील अनेक भागात पारा कमालीचा घसरला असून परभणीमध्ये रात्री सर्वात कमी ३.६ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे. सर्वात निचांकी तापमान राज्यातील हे आहे. गेले ३ दिवस परभणी जिल्ह्यावर धुक्याची लाट पसरल्यामुळे नागरिकांचे व्यवहार सकाळी ११ वाजता सुरू होतात आणि ५ वाजेपर्यंतच सुरू राहता. संध्याकाळी पाचनंतर रस्ते सामसूम होतात आणि अनेक जण शेकोट्यांची ऊब घेताना दिसतात. या थंडीचा बाजारपेठेवरही थंडीचा परिणाम झाला आहे. गारठ्याने राज्याच्या अनेक भागात सकाळी धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. तर राज्यात थंडीपासून वाचण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या पाहायला मिळत आहेत. मुंबई आणि उपनगरातही हवेत गारवा आल्यानं मुंबईकरांना उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, उत्तर भारतातही थंडीची लाट कायम आहे. अमृतसर शहराला धुक्याने वेढलं आहे. शहरावर दाट धुकँ पडल्यामुळे शहराचे व्यवहार उशिरा सुरू होत आहेत. धुक्याचा वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. उत्तरेकडील राज्यांमधून थंड आणि कोरडे वारे वाहत असल्यामुळे राज्यातही थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे राज्यात थंडीने पुन्हा आपले बस्तान बसविण्यास सुरुवात केली आहे. येत्या काही दिवसांत उत्तरेकडील थंडी आणखी वाढणार असल्याने राज्यातही थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Comment