पवारांचे मोदींना सात पानी खरमरीत पत्र

sharad-pawar
मुंबई – राष्ट्रवादी क़ाँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याच्या निर्णयाला जोरदार आक्षेप घेतला असून काल ब्रीच कँडी रुग्णालयातून घरी परतलेल्या पवार यांनी कडक भाषेतील एका सात पानी पत्राद्वारे आपला आक्षेप पंतप्रधानांना कळविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचविलेली ही समिती भारतीय संघराज्य रचनेसाठी धोकादायक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

पवार यांनी आपली भूमिका पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्रात रोखठोक मांडलेली असून त्यात मुंबईचा विकास करण्याच्याबाबतीत मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येत आहे, याची माहिती मला माध्यमांकडून कळली. जर अशी समिती स्थापन होत असेल तर त्या समितीचे अधिकार, कार्यक्षेत्र काय असणार आहे? मुंबई महानगरपालिकेचा यामध्ये काय सहभाग असणार आहे ?

मुंबई महापालिकेचे काम भारतीय घटनेच्या ७४ व्या दुरूस्तीनुसार चालते. जिचे बजेट काही राज्यांपेक्षाही अधिक आहे. भारताने संघराज्य पद्धत स्वीकारली आहे. ज्यामध्ये अपवादात्मक परिस्थितीमध्येच केंद्राचा हस्तक्षेप मान्य केला आहे. मग अशी कोणती परिस्थिती उदभवली की केंद्राला हस्तक्षेप करावा लागत आहे? आपण सुद्धा जास्तीत जास्त अधिकार राज्यांना मिळाले पाहिजेत, अशा विचारांचे आहोत. परंतु या संदर्भामध्ये राज्याच्या कॅबिनेटमध्ये चर्चा करण्यात आलेली नाही किंवा पालिका आणि राज्यात एकत्र सत्तेत असलेल्या शिवसेनेलाही विश्वासात घेतलेले नाही.

Leave a Comment