
इस्लामाबाद – इस्लामाबाद पोलिसांनी मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड झाकीउर रहमान लख्वीला जामीनावर सुटका झाल्यानंतर पुन्हा ताब्यात घेतले असून त्याला कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहोचवल्याचे कलम लावून ताब्यात घेण्यात आल्यामुळे लखवी लगेचच मुक्त होणार नसल्याचे म्हटले आहे.
इस्लामाबाद पोलिसांनी लखवीला पुन्हा घेतले ताब्यात
कालच लखवी याला पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. दरम्यान, लखवीच्या विरोधात पुन्हा न्यायालयात पाकिस्तान जाणार असल्याचे अधिका-यांनी सांगितले आहे. झकी उर रेहमान लखवी हा गेल्या पाच वर्षांपासून पाकिस्तानच्या रावळपिंडी येथील तुरुंगात बंद होता.
दहा लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर लखवी याला न्यायालयाने जामीन दिला होता. पण लखवीला जामीन मंजूर होताच पाकिस्तानच्या दहशतवादासंबंधीच्या भूमिकेवर भारतासह जगभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली होती. पेशावरच्या हिंसाचारानंतर दोनच दिवसांत असा निर्णय आल्याने त्याबाबत अधिक संताप व्यक्त झाला.
