सेन्सेक्सची तेजी आजही कायम

share-market
मुंबई – सलग दुस-या सत्रात सेन्सेक्सची अमेरिकन फेडरल रिझर्व्हने नजीकच्या काळात व्याजदर वाढवण्याची शक्यता नसल्याचा निर्वाळा दिल्याने तेजी कायम आहे. मुंबई शेअर बाजाराच्या शुक्रवारी सकाळच्या सत्रात सेन्सेक्सने ३१४ अंकाची उसळी घेतली.

४१६.४४ अंकानी शानदार गुरुवारच्या सत्रात पुनरागमन केलेल्या सेन्सेक्समध्ये शुक्रवारी ३१४.२९ अंकाची वाढ होत तो २७ हजार ४४०.८६ वर पोहोचला तर निफ्टीतही ८२.१० अंकाची वाढ होत तो आठ हजार २४१.४० वर पोहोचला.

गेल्या पाच सत्रांमध्ये सेन्सेक्सने ११२०.९६ अंक गमावले होते. फेडरल रिझर्व्हबरोबरच बहुप्रतीक्षित वस्तू आणि कर विधेयकाला बुधवारी मंजुरी मिळाल्याने गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली.

Leave a Comment