इसिसने लग्नाला नकार देणार्‍या १५० महिलांना केले ठार

isis
इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी त्यांच्यासोबत लग्नास नकार देणार्‍या १५० महिलांची हत्या करून त्यांचे एकत्रित दफन केले असल्याचे वृत्त तुर्कस्तानच्या मिडीयाने दिले आहे. तुर्कस्तानच्या मानवाधिकार मंत्रालयानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार इराकच्या पश्चिम प्रांतातील अल अनबर मधील फलुजा या गावात ही घटना घडली आहे. अबु अनास अल लिबो या इसिसच्या दहशतवाद्याने या हत्या केल्या. या महिलांनी इसिसच्या दहशतवाद्यांबरोबर लग्न करण्यास नकार दिल्यानंतर त्यांना ठार करण्यात आले. त्यातील कांही जणी गर्भवती होत्या. जिहाद निकाह ही संकल्पना या संघटनेने प्रयक्षात आणली असून त्यानुसार हे विवाह होणार होते. या हत्याकांडामुळे भयभीत झालेल्या या भागातील नागरिकांना आपली घरे सोडून पलायन करावे लागले असल्याचेही समजते.

गेल्या महिन्यातही या संघटनेने याच भागात किमान ५० पुरूष, महिला आणि मुलांची हत्या केली होती. एका लाईनीत उभे करून एकेकाला ठार करण्यात आले होते असेही या मिडीयाच्या अहवालात नमूद केले गेले आहे. इसिसने एक पत्रक आपल्या लढवय्यांसाठी जारी केले असून त्यात महिलांचा कब्जा कसा घ्या, त्यांना कसे वापरा आणि त्यांच्याबरोबर कसे दुष्कर्म करा याचे मार्गदर्शन केले गेले आहे असेही समजते.

Leave a Comment