आता सुपरसिरीज फायनलचे सायनासमोर आव्हान

saina
दुबई – जगातील पहिल्या आठ रँकिंगमध्ये असलेल्या बॅडमिंटनपटूंमधील स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीडब्लूएफ जागतिक बॅडमिंटन सुपरसिरीज फायनलमध्ये भारताची भिस्त सायना नेहवाल आणि किदांबी श्रीकांतवर असून हे दोघे एकेरीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील.

या सुपरसिरीज फायनलला पुरुष दुहेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीसाठी भारताचे बॅडमिंटनपटू पात्र ठरलेले नाही. ते पाहता आता सायना आणि
श्रीकांतकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. ‘ग्रुप ए’मध्ये सायनाचा समावेश आहे. तिला गटवार साखळीत चीनच्या शिक्सियन वॅँगसह जी हुआन सुंग आणि युऑन जू बाये या दक्षिण कोरियाच्या बलाढय बॅडमिंटनपटूंशी दोन हात करायचे आहेत.

श्रीकांतचा ‘ग्रुप बी’मध्ये समावेश असून तुलनेने त्याला सोपा ‘ड्रॉ’ आहे. सायना आणि श्रीकांतसमोर आता उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्याचे आव्हान आहे. कारण ग्रुपमधून दोघांनाच उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे.

Leave a Comment