मोनिका मोरे रेल्वे प्रवासी सल्लागार कमिटीवर!

monika-more
मुंबई : मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सुचविलेल्या मोनिका मोरेची विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार कमिटीवर नियुक्ती करण्यात आली रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोनिका मोलाची कामगिरी बजावणार आहे.

रेल्वे अपघातात आपले दोन्ही हात गमावलेली महाराष्ट्राची धैर्यकन्या मोनिका मोरे ही आता रेल्वे प्रवाशांच्या समस्यांना थेट वाचा फोडणार आहे. विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीमध्ये तिची नेमणूक झाली आहे.

राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकर यांनी तिचे नाव सुचवले असून शहरातल्या प्रत्येक खासदाराला एकेक सदस्य नामनिर्देशित करण्याची मुभा असते. त्यानुसार सचिन यांनी मोनिकाचे नाव सुचविले होते.

Leave a Comment