आनंदने ‘टायब्रेकर’वर जिंकली लंडन बुद्धिबळ क्लासिक स्पर्धा

vishwanathan
लंडन – लंडन बुद्धिबळ क्लासिक स्पर्धा ‘टायब्रेकर’वर भारताच्या माजी जगज्जेता विश्वनाथन आनंदने कारकीर्दीत प्रथमच जिंकली असून गेल्या महिन्यात जगज्जेता नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनविरुद्ध जगज्जेतेपदाची लढत गमावूनही आनंदने त्याचा दमदार फॉर्म दाखवला.

ही स्पर्धा आनंद जिंकेल, असे पहिल्या चार राउंडमधील निकालानंतर वाटले नव्हते. मात्र स्पर्धेतील नियमाप्रमाणे काळ्या मोह-यांनिशी जो जास्त विजय मिळवतो तो जेतेपदाच्या दावेदारांमध्ये येतो. त्याप्रमाणे आनंदने पाचव्या आणि अंतिम राउंडमध्ये इंग्लंडच्या मायकेल अ‍ॅडम्सला काळ्या मोह-या घेऊन खेळताना ३६ चालींमध्ये नमवले. ३२व्या चालीला घोडयाची खेळलेली चुकीची चाल अ‍ॅडम्सला पराभव मान्य करायला लावणारी ठरली. या स्पर्धेत यंदा एकाही बुद्धिबळपटूला काळ्या मोह-या घेऊन खेळताना विजय मिळाला नव्हता. त्याचा फायदा आनंदला टायब्रेकरसाठी पात्र ठरण्याकरता झाला.

Leave a Comment