आता चहाची ऑर्डरही द्या ऑनलाईन

chai
मुंबई : आपण एखाद्या कामात एवढे मग्न असतो आणि मग आपल्याला अचानक आठवण येते ती गरमागरम चहाची. मग चहावाल्यासाठी दहावेळा फोन करा आणि मग येतो चहा किंवा नाक्यावरच्या चहावाल्याच्या टपरीवर उभे राहून चहा केव्हा भेटेल यांची वाट पहावी लागते. पण आता ही पायपीट आणि वेळ देखील वाचणार आहे. पण कसा? आता चहा आपल्याला मिळणार आहे एका क्लिकवर. विश्वास बसत नाही ना? पण ही गोष्ट सत्य आहे. आजकाल सर्वच गोष्टी ऑनलाइन मिळतात मग चहा कशी मागे राहील.

या अभिनव प्रयोगाला मुंबईतल्या वांद्रे येथे सुरुवात झाली असून ही सुरुवात छोटू चहावाल्याने ऑनलाईन सेवा देण्यास सुरवात केली आहे. त्याच्या http://chotuchaiwala.com/ या बेबसाईट (बेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा) फक्त एक क्लिक करुन तुम्ही चहाची ऑर्डर देऊ शकता. चहाची ऑनलाईन ऑर्डर मिळताच काही मिनिटात गरमा-गरम चहा घेऊन चहावाला हजर होणार आहे.

या ऑनलाईन ऑर्डर सिस्टिमला चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळेच बांद्रा येथील नॅशनल कॉलेजच्या मागे असलेल्या रमण मिश्रा यांनी पाच नवीन थर्मास विकत घेतले. कारण या काळात त्यांचा व्यवसायात वाढ होऊन ती ५०० कपांवरुन १००० कपांपर्यंत गेली.

Leave a Comment