अखेर जितेंद्र आव्हाड यांचे निलंबन मागे

jitendra-awahad
नागपूरः वादग्रस्त विधान केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विधानसभाध्यक्षांनी नागूपरचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबनाची कारवाई केली होती. आता मात्र त्यांचे निलंबन आज मागे घेण्यात आल्यामुळे आव्हाड यांना दिलासा मिळाला.

कायदा-सुव्यवस्थेवरच्या चर्चेला गुरुवारी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देत होते. दरम्यान, विधानसभेत गोंधळ झाला. मुख्यमंत्री बोलत असताना छगन भुजबळ उभे राहून सरकारकडून निवेदनाची मागणी करत असताना गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी त्यास आक्षेप घेतला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमकपणे वादग्रस्त विधान केल्याने संघर्ष पेटला. सत्ताधारी सदस्यांनी आव्हाड यांच्या निलंबनाची जोरदार मागणी केली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज पहिल्यांदा १० आणि त्यानंतर दोनवेळा प्रत्येकी १५ मिनिटे तहकूब करण्यात आले. कामकाज सुरू होताच संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी आव्हाड यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला आणि तो मंजूर करण्यात आला. या कारवाईचा निषेध करत राष्ट्रवादीने शुक्रवारी अधिवेशनाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला होता.

Leave a Comment