काँग्रेस नगरसेवकाच्या हॉटेलमध्ये `सेक्स रॅकेट’

sex
मुंबई – काल रात्री उशिरा पोलिसांनी उल्हासनगरच्या ऍम्ब्रोसिया या हॉटेलमध्ये धाड टाकली असता येथे सर्रासपणे वेश्या व्यवसाय चालत असल्याचे आढळून आले . याप्रकरणी वेश्याव्यवसाय करणा-या ८ महिलांना ताब्यात घेण्यात आले असून हॉटेलचा मॅनेजर व कॅशियर यांना पोलिसांनी अटक केली आहे. एका काँग्रेस नगरसेवकाच्या मालकीचे हे हॉटेल आहे.

उल्हासनगर-3 येथे विठ्ठलवाडी (प) रेल्वे स्थानकाजवळ ऍम्ब्रोसिया हॉटेल आहे . या हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहीती मध्यवर्ती पोलीस ठाण्याला मिळाली होती . या माहितीच्या आधारे मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक हर्षदा बाळासाहेब दगडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने रात्री ऍम्ब्रोसिया हॉटेलवर धाड टाकली. त्यावेळी हॉटेलच्या एका रुममध्ये वेश्या व्यवसाय करणार्या 8 महिला ग्राहकांची वाट बघत असलेल्या स्थीतीत आढळल्या . त्यांच्याकडून पोलीसांनी काही आपत्तीजनक साहित्य जप्त केले. या महिलांनी दिलेल्या जबानीवरुन हॉटेलचा मॅनेजर राजेश राजदेवसिंग (३९) रा.आदर्श कॉलनी कैलासनगर , काटेमानवली ,कल्याण (पूर्व) व कॅशियर दिनेश चिमप्पा शेट्टी (४७) रा. अन्सारी कोर्ट , विक्रोळी (पूर्व) हे या महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेत होते हे समजले. पोलीसांनी दोन्ही आरोपींना व महिलांना ताब्यात घेतले आहे. महिलांचीची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे . उल्हासनगर शहरातील अनेक हॉटेल आणि लॉजमध्ये खुलेआम वेश्याव्यवसाय चालत असल्याचे वृत्त असून अशा अनैतिक धंद्यांमुळे उल्हासनगर शहराचे नाव बदनाम होत चालले आहे.

Leave a Comment