जमिनीतून प्रकाश येणारी गूढ विहीर

vihir-12
जगात अनेक आश्वर्ये लपली आहेत आणि शोध घेऊनही या आश्चर्यामागचे गुपित अजून उलगडलेले नाही. असेच एक आश्चर्य पोर्तुगालमध्येही आहे. पोर्तुगालमधील सिन्काराजवळील क्यूंटाडा रिगालेरिया येथे लेडिरिंथिक ग्राटो नावाचे एक विवर आहे. विवर म्हणायचे पण प्रत्यक्षात ही बांधलेली एक खोल विहीर आहे. या विहीरीच्या तळातून प्रकाश येतो मात्र तो कुठून येतो याचा दीर्घ काळ शोध घेऊनही त्यामागचे रहस्य उलगडलेले नाही.

या विहीरीचे बांधकामही अगदी वैशिष्टपूर्ण असून एखादा मिनार उलटा ठेवावा तशी ही विहीर दिसते. वर रूंद आणि खाली निमुळती होत गेलेल्या या विहीरीत उतरण्यासाठी पायर्‍याही आहेत. ही विहीर चार मजली इमारतीइतकी खोल आहे. विशेष म्हणजे या विहीरीला विशिंग वेल असेही नांव आहे. म्हणजे येथे नाणे टाकायचे आणि आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची. ही विशिंग वेल ती इच्छा फलद्रूप करते असा लोकांचा विश्वास आहे. या विहीरीला भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या खूपच मोठी आहे.

Leave a Comment