डॉ.सदानंद मोरेंची संमेलनाध्यक्षपदी निवड

sadanand-more
पुणे : संत साहित्याचे अभ्यासक आणि प्रसिद्ध लेखक डॉ.सदानंद मोरे यांची घुमानमध्ये होणा-या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली असून अध्यक्षपदासाठी घेण्यात आलेल्या निवडणूकीत ७१ मतांनी मोरे यांचा विजय झाला आहे.

सदानंद मोरे यांच्यासह डॉ. अशोक कामत, पुरूषोत्तम नागपुरे हे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी रिंगणात होते. या निवडणुकीसाठी एकूण १०७४ पैकी १०२० इतके विक्रमी मतदान झाले असून, गेल्या ५० वर्षातील हे सर्वाधिक मतदान आहे. यात डॉ.मोरे यांना ४९८, कामत यांना ६५, सासणे यांना ४२७ तर नागपुरे यांना २ मते मिळाली आहेत. डॉ.मोरे यांच्या निवडीनंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Comment