शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे

ajit-pawar
नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेस नेते, आमदार अजित पवार यांनी विदर्भ-मराठवाडय़ातील शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारने दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज त्वरित जाहीर करावे, अशी मागणी विधानभवनात पत्रकारांशी बोलताना केली.

दुष्काळावर विधानसभेत चर्चा झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलले होते. आम्ही विरोध करणार नाही. शेतक-यांच्या आत्महत्येचे आम्हाला राजकारण करायचे नाही. विदर्भ-मराठवाडय़ात दुष्काळामुळे होत शेतकरी आत्महत्या करीत आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या विधवेला प्रतिमहा एक हजार रुपये पेन्शन देण्यात यावी, तसेच त्यांच्या मुलांचा शिक्षणाची जबाबदारी सरकारने उचलावी अशी मागणी अजित पवार यांनी केली. शेतकऱयांचे कर्ज आणि वीज बिल भरावे, अशी मागणी भाषण विधानसभेत केली असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment