धोकादायक देशात इराक पहिल्या तर पाक ८ नंबरवर

country
जगातील सर्वात धोकादायक देशांच्या यादीत इराक पहिल्या नंबरवर तर पाकिस्तान आठव्या नंबरवर असल्याचा अहवाल यूएस इंटेलिजन्ससाठी काम करणार्‍या इंटेल सेंटर या वॉशिग्टनस्थित कंपनीने दिला आहे. कंट्री थ्रेट इंडेक्सखाली ही पाहणी केली गेली होती. कंपनीने हा अहवाल यूएस थिंक टँकला दिला आहे.

या यादीत द.आशियाई देशात अफगाणिस्तान चवथ्या नंबरवर असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल देताना बंडखोरी, दहशतवादाचे संबंधित देशातील प्रमाण अॅलर्ट मेसेजिंग, ट्राफिक, व्हिडीओ, फोटो आणि त्या त्या देशांत घडलेल्या घटना, त्यात किती लोक ठार आणि किती जखमी झाले या बाबींचा विचार केला गेला आहे. गेल्या तीस दिवसांतील ही निरीक्षणे आहेत.

या यादीत पहिल्या दहा देशांत नायजेरिया दोन नंबरवर आहे. सोमालिया तीन नंबरवर, येमेन पाच नंबरवर, सिरीया सहा नंबरवर, लिबिया सात नंबरवर, इजिप्त नऊ नंबरवर तर केनिया १० नंबरवर आहे. एकूण ४५ देशांसाठी ही निरीक्षणे नोंदविली गेली असून त्यात कंट्री थ्रेट इंडेक्स ० पेक्षा जास्त असलेल्या देशांचाच विचार केला गेला. वरील देशात हा इंडेक्स ७४ आहे.

Leave a Comment