मानवी अवयव तस्करीतूनही इसिसची कमाई

human
रक्का- सिरीया आणि इराकच्या कांही भागात इस्लामिक स्टेटची स्थापना केलेले दहशतवादी संघटनेसाठी तेल विक्रीतून जशी भरघोस कमाई करत आहेत तशीच कमाई ते मानवी अवयव तस्करीतूनही करत असल्याचे वृत्त इंग्रजी वेबसाईट अल मॉनिटरने दिले आहे.

या वृत्तानुसार जगभरात त्या दहशतवादी संघटना कार्यरत आहेत त्यात सर्वाधिक श्रीमंत संघटना म्हणून इसिस ओळखली जात आहे. इराकमध्ये ताब्यात असलेल्या भागातून दररोज ही संघटना दररोज ३० लाख डॉलर्सची कमाई करते आहेच पण सौदी आणि कांही परदेशी डॉकटरांच्या मदतीने मानवी अवयव तस्करीतूनही ही संघटना प्रचंड कमाई करते आहे. यासाठी संघटनेतील मृत सैनिक तसेच बंधक बनविलेल्या ज्यू आणि ख्रिश्चन माणसांच्या देहांचा उपयोग केला जात आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेनेही या संघटनेकडे प्रचंड पैसा आहे आणि जगभरात कुठेही सतत दोन वर्षे युद्ध सुरू ठेवण्याइतकी शस्त्रसामग्री या संघटनेकडे असल्याचा अहवाल या पूर्वीच दिला आहे.

या संघटनेचे वार्षिक उत्पन्न २ अब्ज डॉलर्स इतके असल्याचे सांगितले जात आहे. मोसूल क्षेत्रातील एका डॉक्टरने दिलेल्या माहितीनुसार मानवी अवयव तस्करीसाठी सौदी व विदेशातील कांही डॉक्टर्स या संघटनेने पगारी नेमले आहेत आणि स्थानिक डॉक्टरांबरोबर मिसळून राहण्याचे आदेश त्यांना दिले गेले आहे. शरीरातून अववय काढून घेण्यासाठी रूग्णालयातून शस्त्रक्रिया केल्या जातात आणि हे अवयव त्वरीत नेटवर्कच्या सहाय्याने तस्करी करून मागणीनुसार पाठविले जात आहेत. अवयव पाठविताना प्रचंड रकमा गोळा केल्या जात आहेत.

Leave a Comment