आजपासून युती सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ

devendra
नागपूर : आजपासून संसार पुन्हा थाटलेल्या भाजपा-शिवसेना युती सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होत असून विरोधकांनी सत्ताधा-यांना टोलमुक्ती, दुष्काळ, एलबीटीसह अन्य मुद्यावर घेरण्याची रणनिती आखली आहे. शेतकऱयांच्या आत्महत्या आणि दुष्काळाच्या प्रश्नावर पहिल्याच दिवशी विधानभवानावर हल्लाबोल मोर्चा काढून सरकारला कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेस आक्रमक झाली आहे.

शिवसेना सत्तेत गेल्याने रिक्त झाल्याने विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसची सकाळी बैठक होणार असून, त्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे सदस्य विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन विरोधी पक्षनेतेपदाची मागणी करणार आहेत. काँग्रेसनेही विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment