३ लाख कार विक्रीचे आहे ‘होंडा’चे लक्ष्य

honda
नवी दिल्ली – आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये आपल्या वाहनांची विक्री वाढवून ३ लाखच्या स्तरावर नेण्याचे लक्ष्य वाहन उद्योग क्षेत्रातील अग्रमानांकित कंपनी ‘होंडा कार्स इंडिया लिमिटेड’ने ठेवले असून कंपनीने देशात कारभार विस्तार करण्यासाठी अभियान सुरू केले आहे. २०१३-१४ मधील लक्ष्यापैकी ८३ टक्के विक्री पूर्ण केली होती. सद्या कंपनीने ऑक्टोबर महिन्यापर्यंत ४३ टक्के वृद्धी सहित १ लाख पेक्षा जास्त वाहनांची विक्री केली आहे. कंपनीच्या ग्रेटर नोएडा आणि अलवर (राजस्थान) या वाहन निर्मिती प्रकल्पातून प्रत्येक वर्षी २ लाख ४० हजार कारची निर्मिती होते. आपले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी कंपनी या दोन्ही निर्मिती केद्रांचा विस्तार करण्याची शक्यता आहे.

Leave a Comment