उ.कोरियात किम जोंग नाव वापरण्यावर बंदी

koria
सोल – उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उंग याने त्याचे नांव अन्य कोणाही नागरिकाला वापरता येऊ नये यासाठी हे नांव ठेवण्यावर बंदी घातली असल्याचे सांगितले जात आहे. जगात एकमेव किम जोंग उंग असावा यासाठी त्याने हा हुकुम काढला असल्याचेही समजते.

आपले वडील हुकुमशहा किम जोंग दुसरे यांच्यानंतर २०११ साली या हुकुमशहाने कोरियाची सत्ता हाती घेतली आहे. त्याचे आजोबा किम जोंग सुंग हे उत्तर कोरियाचे संस्थापक मानले जातात. २०११ मध्ये जेव्हा किम दुसरा सत्ता सोडणार होता तेव्हाच त्याने किम जोंग या नावाची नोंदणी नवीन जन्म होणार्‍या बालकांसाठी करता येऊ नये यासाठी या नाववापरावरच बंदी आणली होती आणि तसे आदेश संबंधित विभागांना दिले होते. आपल्याच कुटुंबाकडे सत्ता कायम राहावी यासाठी अपंगत्व आलेला किम जोंग दुसरा कायम प्रयत्नशील होता व त्यातूनच त्याने २००८ सालातच किम जोंग उंगला महत्त्वाचे राजकीय पद दिले होते.

उत्तर कोरियातील नागरिकांना आजही या सर्व किम हुकुमशहांचे वाढदिवस घराघरातून दणक्यात साजरे करावे लागतात तसेच गळ्यात त्यांच्या नावाची आणि फोटोची पदके घालावी लागतात आणि घरातून त्यांचे फोटोही लावावे लागतात असेही समजते.

Leave a Comment