५ डिसेंबरला फडणवीस सरकारची पहिली मुहूर्तवेढ

fadnvis
मुंबई : येत्या ५ डिसेंबरला देवेंद्र फडणवीस सरकारच्या पहिल्या विस्तार होणार असून या नव्या मंत्र्यांचा शपथविधी विधानभवनाच्या प्रांगणात सकाळी १० वाजता होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तार सोहळ्यात भाजपचे १० आणि शिवसेनेचे १२ मंत्री शपथ घेतील, अशी प्राथमिक माहिती आहे.

या मंत्रीमंडळात शिवसेनेला कमी महत्वाच्या खात्यांवर समाधान मानल्याचे दिसत असून शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर यांनी भाजपने दिलेला प्रस्ताव मान्य असल्याची माहिती दिली आहे.

शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपदासह गृहखात, सिंचन अशा महत्त्वाच्या खात्यांची मागणी केली होती. तसेच केंद्रातही एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद वाढवून देण्याची सेनेची मागणी केली आहे. मात्र राज्यात १२ मंत्रिपदे देऊऩ भाजपने सेनेला खूश करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वीही झाल्याचे दिसत आहे. मात्र केंद्रातील चित्र अजूनही स्पष्ट नाही.

Leave a Comment